kailash mansarovar by swami pranabananda
Kailash-Mansarovar
Kailash-Mansarovar
AUTHOR :- Asha Bhand; Baba Bhand
कैलास पर्वत हे सृष्टीचे बीज मानले जाते. तसेच ही संकल्पभूमी आहे.
इथे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. विष्णू व शंकर यांचे संकल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे सृजनत्व, अशी हिंदूंची श्रद्धा आहे.
कैलास हे शंकर आणि पार्वतीचे हिमालयातील निवासस्थान; तर मानस सरोवर हे निसर्गाने निर्माण केलेले अद्भुत स्वप्न आहे. ब्रह्मदेवाने मनाने ह्या सरोवराची निर्मिती केली.
वेद, उपनिषदे, स्कंदपुराण, महाभारत आणि मेघदूत या ग्रंथात कैलास-मानसचा उल्लेख आहे.
कैलास-मानस हे श्रीकृष्ण, दत्तात्रय, आणि आदिशक्ती महालक्ष्मीची भूमी आहे.
असे हे हिमालयातील अद्भुत कैलास-मानस श्रद्धाळू आणि साहसी पर्यटकास सतत खुणावत असते. उत्तर हिमालयातील निसर्गचक्राची बदलती सुंदर रूपे, अद्भुत सौंदर्याचा अनुभव आणि मानस काठची निळ्याभोर आकाशाखालची चिरशांतता अनुभवणे हे या प्रवासाचे वेगळेपण आहे.
