kanhoji aangre marathi book
Kanhoji Aangre
Kanhoji Aangre
AUTHOR :- Manohar Salgaonkar
पु. लं. चे वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणजे ‘कान्होजी आंग्रे’. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच पु. ल. सांगतात, ‘‘कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजी लिहिलेली कादंबरी अचानक मला वाचायला मिळाली. सहज म्हणून मी पुस्तक उघडलं आणि ते न थांबता वाचतच गेलो. हे पुस्तक इंग्रजी वाचता न येणाऱ्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचवावं असं वाटलं.’’ आणि या पुस्तकाची निर्मिती झाली.
हिंदवी स्वराज्याचे शिवछत्रपतींचे स्वप्न पाहण्याची दृष्टी नसलेल्या आपमतलबी स्वकीयांशी कान्होजींना झुंजावे लागले. दिल्लीच्या तख्तावर औरंगजेबासारखा धर्मांध आरूढ झालेला, पोर्तुगीज, फे्रंच, डच, इंग्रज यांची पाळेमुळे खोल जायला लागलेली, छत्रपतींच्या सिंहासनाला कौटुंबिक कलहाने तडा गेलेला अशा विपरीत कालखंडात आपले सर्वस्व पणाला लावून पश्चिम सागरावर मराठेशाहीची हुकूमत असल्याचे सिद्ध करणारा ‘कान्होजी आंग्रे’हा पराक्रमी पुरुष. जाणून घेऊयात या पराक्रमी पुरुषाची जीवनगाथा.
